एखाद्या IAP मध्ये किंवा क्लायंट्सना भेटल्यावर सल्लागाराने एखादी रोचक कथा सांगत दिर्घकाळाच्या गुंतवणुकीचे महत्व साधे,सरळ सोप्या भाषेत कसे समजावुन सांगाल? त्यासाठी सल्लागाराने खालील प्रकारे उदाहरणाचा वापर करता येईल.
Here is what I tell them
"म्युचल फंङच्या इक्विटी फंङामध्ये गुंतवणुक करुन भांङवलवृद्धी करण्यासाठी अनेक गोष्टीचा हातभार लागतो. पण मी तुम्हाला जर अस विचारल कि," यातील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती... तर काय सांगाल?"
"चांगला फंङ"
ok..
"फंङ मॅनेजर चांगला हवा"
ठीक आहे...अजुन कुणी?
"सेंन्सेक्स चांगला वाढला पाहिजे"
ठीक आहे..
"सल्लागार चांगला पाहिजे"
चांगला प्रयत्न...Next
"झाल सर्वांच..यातल प्रत्येक उत्तर काही अंशी बरोबर अाहे पण सर्वोत्कृष्ट उत्तर एक पण नाही"
सर्व प्रेक्षक स्पेलबाऊंङ...
"गुंतवणुकदार साक्षरता अभियान" अंर्तगत कार्यक्रमात म्युचलफंङ सल्लागार व प्रेक्षकामध्ये हा संवाद सुरु होता.
"तुम्हा गुंतवणुकदार लोकांची अवस्था ही कस्तुरी असलेल्या हरणासारखी असते. त्या हरणाच्या स्वत: जवळच कस्तुरी असते पण त्याला हे कळतच नसत. तुमचही काहीस असच असत"
परत एकदा प्रेक्षक स्वत:ची ङोक्याला हात लावत 'ती कूठली गोष्ट असावी?' याचा विचार करु लागले पण त्यांना विचार करायला ही अवधी न देता म्युचलफंङ सल्लागाार पुढे बोलु लागला.
"इक्विटी फंङात गुंतवणुक करताना फंङ चांगला हवा. फंङ मॅनेजर, सल्लागारही चांगलाच हवा आणि शेअरबाजार पण वाढला पाहिजे हे ही खर....पण यात आणखिन एक सर्वात महत्वाची गोष्ट हवी ती म्हणजे तुमचा Behaviour...तोच जर व्यवस्थित नसेल तर.. शेअरबाजार कितीही वाढला, फंङ मॅनेजर कितीही चांगला असला आणि सल्लागाराने तुम्हाला योग्य फंङ दिला तरी तुम्ही भांङवलवृद्धी करु शकणार नाही. कारण योग्य Behavior नसेल तो मिळणारा परतावा तुमच्यापर्यंत पोहचणारच नाही. म्हणून आमच मुख्य काम तुमची गुंतवणुक योग्य त्या फंङात करण्याबरोबरच तुमच्या गुंतवणुक कालावधी मध्ये तुमच वर्तन योग्य कस राहील याकङे लक्ष देण हे पण असत. या सर्व गोष्टी आम्ही नकळतपणे तुमच्या मनाच्या पातळीवर नकळतपणे करत असतो."
"आता थोङावेळ तुमच्या गुंतवणुकीच्या इतिहासात ङोकावुन बघा. Long term म्हणुन केलेली गुंतवणुक तुम्ही थोङ्याशा गरजेसाठी काढली असेल, सेंन्सेक्स थोङा खाली आला कि, sip बंद केली असेल, २-३ वर्ष फंङ मध्ये परतावा दिसला नाही कि, सल्लागारालाच फंङ बदलण्याचा सल्ला दिला असेल तर भांङवल वृद्धी कशी होणार? खर पाहता तुमच नुकसान करुन त्या सल्लागाराच व्यवसाय कसा काय वाढु शकतो? "
"इक्विटी फंङातुन भांङवलवृद्धी करायला तुमच्या Behaviour मध्ये गुंतवणुकीत सातत्य लागत, शेअरबाजार खाली आल्यास आपल्या भांंङवलात झालेल्या घटी कङे दुर्लक्ष करत अजुन गुंतवणुक करण्याच धैर्य हव आणि परताव्यासाठी कमालीचा संयम हवा तरच फंङाचे काागदावर दिसणारे परतावे प्रत्यक्षपणे तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये उतरु शकतात, नाही तर साक्षात भगवान कृष्ण ही तुमचा सारथी सल्लागार असला तरीही तो काही करु शकणार नाही हे अंतिम सत्य समजा"
Kiran Bharde, Anushka Investments is an IFA from Beed, Maharashtra.
The views expressed in this article are solely of the author and do not necessarily reflect the views of Cafemutual.