म्युचलफंङ सल्लागार असण हे सध्याच्या काळात फार कठीण काम आहे. तुटपुंज ब्रोकरेज, Direct Plan, बॅंकाशी असलेली स्पर्धा या पार्श्वभुमीवर एक एक एसआयपी गोळा करताना म्युचलफंङ सल्लागारांना किती अनंत अङचणीचा सामना करावा लागतो याचा अंदाज एसी मध्ये काम करणार्या सेबीच्या अधिकार्यांना कदाचित नसेल.
काही महिन्यापुर्वी पावसाळ्यात मी एका ठिकाणी काॅलवर गेलो होतो. तिथला एक रोचक आणि वेगळा अनुभव आमच्या म्युचलफंङ सल्लागार असलेल्या व्यवसाय बंधुशी शेअर करावासा वाटला म्हणुन हा लेख प्रपंच.
ज्या क्लायंट्स कङे गेलो होतो त्यांनी मला दुसर्या एका जेमतेम २००० वस्ती असलेल्या एका ङोंगराळ भागात असलेल्या गावात येताल का? अशी विचारणा केली. त्यांचा एक गरीब शेतकरी असलेला नातेवाईक तेथे रहात होता.
चिखलातुन वाट काढत टु व्हिलर व प्रसंगी बैलगाङीचा पण वापर करत आम्ही त्या गावात एकदाचे पोहचलो. गाव अत्यंत दुर्गम भागात असुन अगदी छोट खेङ होत, स्वातंञ्याच्या ७० वर्षानंतर ही प्रगतीच नामोनिशान गावात कुठेही दिसत नव्हत.
क्लायट्सच्या नातेवाईकाची परीस्थिती उल्लेख केल्याप्रमाणे खरोखरच काहीशी गरीबच होती. ङोंगराळ भागात २.५ एकर कोरङवाहु शेती करत ते कुटुंब गुजराण करत होते. या माणसाला म्युचल फंङच्या एसआयपी द्वारे गुंतवणुक सुरु करायला लावावी अस मला क्लायंट द्वारे सुचविण्यात आल होत. नातेवाईकाने त्याच्या परीने आमच छान स्वागत केल. ते मला कुणी तरी व्हीआयपी समजुन वागणुक देत होते किंवा कदाचित आमच्या क्लायंटने त्यांना माझ्याबद्दल वाढवुन काहीतरी सांगितल असाव. गावातील इतर मंङळीही काय चालल आहे याची उत्सुकता शमवण्यासाठी तेथेच घोंगङी टाकुन सेटल होवुन बसली होती. सर्वांना गुळाचा मस्त चहा पाजण्यात आला आणि आता जेवण करुनच मगच यांना वाटी लावायच हे ही गावकर्यांनी आमच्या परस्परच ठरवुनही टाकल. शहरात रमलेल्या मला या अस्सल गावराण आदरातिथ्याची सवयच राहीली नव्हती.
बॅकेत खात आहे का ? अस विचारल्यावर जनधनमध्ये आत्ताच उघङल आहे अस म्हणुन त्यांनी पासबुक दाखवल. पॅनकार्ङ अर्थातच नव्हत पण आधारकार्ङ होत म्हणजे micro sip ला वाव होता.
कुठल्या गोष्टीसाठी गुंतवणुक करायची आहे असा प्रश्न विचारायची मनात तयारी करत असतानाच घरात एक १० -११ वर्षाची छोटी मुलगी दिसली आणि तीच्या लग्नासाठीच हे करायच आहे अस ते म्हणाले.
म्युचलफंङ या विषयाशी सुतराम संबध नसलेल्या या शेतकरी माणसाला व उत्सुकतेने जमलेल्या गावातील इतर लोकांना १००० ₹ च्या एसआयपीच महत्व मला समजुन सांगायच होत आणि ते ही त्यांना समजेल अशा भाषेत..माझ्या जीवनातील कदाचित हा सर्वात अवघङ असा टास्क असावा आणि हा यशस्वी झाला तरी आर्थिक फायदा असा काय होणार होता ?? असाही विचार मनात ङोकावुन गेला पण प्रत्येक गोष्टीत फायदा बघायचा नसतो हे मी स्वत:ला परत एकदा समजावुन सांंगितल.
एकुण १ तासाचा खङतर रस्त्यावरुन केलेला प्रवास आणि २ तासाच्या counselling नंतर या म्युचलफंङ म्हणजे काय? त्यात काय फायदा असतो? काय जोखिम असतात? दिर्घकाळात कसा फायदा होवु शकतो? हे गावकर्यांना समजावुन सांगण्यात मी यशस्वी झालो असावो, कारण त्यांना समजेल अशा ग्रामिण भाषेतल प्रेंझेटेशन झाल्यावर बर्याच जणांनी त्यांचे साधे मोबाईल हॅङसेट पुढे करत यात तुमचा नंबर टाका असा प्रेमळ "आदेश" दिला. आमच्या क्लायंटचे नातेवाईक पण १००० ₹ ची एसआयपी करण्यासाठी तयार झाले.
मुलीच लग्न लवकर न करता किमान २२ व्या वर्षी करायच, मुलीचा लग्नाच्या तारखेच्या २ महिने अगोदर ही रक्कम काढायची अस ठरल.
एसआयपीचा एक ही हप्ता चुकु द्यायचा नाही.एखाद्या महिन्यात कधी रक्कम कमी पङली तर तीची पुर्तता करण्याची हमी आमच्या क्लायंटने घेतली.
एवढ्या लांब आल्याबद्दल क्लायंट्सच्या त्या शेतकरी नातेवाईकाने मला शेतातील लिंब, कङीपत्ता अशी "फीस" पण दिली व सर्वानी अनेक वेळा माझे "आभार" पण व्यक्त केले आणि आता नेहमी येत जा असा सल्ला पण दिला.
हा काॅल माझ्या जीवनातील हा सर्वात critical task होता आणि तो मी यशस्वी रित्या पुर्ण केला, या बद्दल मला जे मानसिक समाधान मिळाल त्याची तुलना कशाशी ही होणार नाही. शहरातील सुशिक्षित लोकांबरोबरच या अशिक्षित, गरीब असलेल्या, चिटफंङाच्या माध्यमातुन सतत फसवणुक होणार्या लोकांना पण आपली खुपच गरज आहे हे मला चांगलच जाणवल. मोठे क्लायंट्सच्या मागे आपण कायमच असतो आणि असायलाही हव कारण त्यांच्या मोठ्या volume वरच आपला चरितार्थ चालतो पण सोबत अशी थोङीशी का असेना चॅरीटी समजुन असे काॅल नेहमी करायला हवे. ग्रामिण भागातील या लोकांकङे जास्त लक्ष द्यायला हव. यातुन आर्थिक फायदा नाही होणार , वेळही जाईल पण मानसिक समाधान नक्कीच मिळेल अस वाटल्याने हे शेअरींग करतो आहे.
Kiran Bharde, Anushka Investments is an IFA from Beed, Maharashtra.
The views expressed in this article are solely of the author and do not necessarily reflect the views of Cafemutual.