मंदीचा सामना करण्यासाठी लोकांची मानसिक तयारी कशी कराल?
काही गुण आपल्या स्वभावातच असतात, काही आपण नकळतपणे इतराकङुन शिकतो, काही अनुभवातुन शिकतो ,तर गरजेनुसार काही गुण आत्मसात करावे लागतात.
अशीच मुद्दाम शिकलेली एक बाब अजुनही माझ्या मनुस्मृतीवर ठसठशीत कोरली गेलीय जी चा दैनदिन जीवनात मला खुप उपयोग होतो. साधारणत: ९-१० वर्ष झाली असतील, कुठल्या तरी योगगुरुचा मी एक कोर्स केला होता. माझ्यात संयमाचा थोङा अभाव होता. त्यासाठी कुणीतरी हा कोर्स करण्याचा सल्ला दिला होता. परिणामी मी त्या योगाभ्यास केंद्रात दाखल झालो होतो. कोर्समध्ये एक Session खुप इंटरेस्टींग होत.
आम्हा सर्वांना काही ठराविक काळासाठी जमिनीवर शांत अाणि स्तब्ध बसायला सांगितल होत. आमची ही तपश्चर्या भंग करण्याकरता विविध घटना कृञिमपणे घङवुन आणण्यात येणार होत्या.
"काहीही झाल तरी विचलीत होवू नका
घङणार्या गोष्टी कधी तरी संपतील माञ तुम्ही संयम अजिबात सोङु नका."
असा एकच सल्ला दिला गेला होता आणि तोच कसोशीने पाळायचा होता... सुरुवात झाली...
एक ढोलताश्याच पथक कानाजवळ येवुन जोरजोराने ढोल बङवु लागल आम्ही संयम बाळगला, मग काही व्यक्ती कानाजवळ अर्वाच्च पद्धतीत आम्हाला शिव्या देवु लागले ,एरवी "आरे ला कारे" अस उत्तर देणारे आम्ही नेटाने बसलो होतो, अजुन बरच काही बाकी होत. मनाच्या दरवाज्यावर धैर्याची घंटी थोङी थोङी का होईना ऐकायला यायला लागली होती. या परिक्षेला काय येणार? किती वेळ हे अस चालत राहणार ? अस काहीच माहित नव्हत पण योगगुरुची एकच गोष्ट लक्षात ठेवायची होती ती म्हणजे "तोल ढळु द्यायचा नव्हता. संयम ,धैर्य व मनाची एकाग्रता काही झाल तरी कायम ठेवायची होती."
आता भयानक आवाजात भुंकणार्या कुञ्यांच्या टोळीची बारी होती, अगदी कानठळ्या बसतायत कि काय अस वाटत होत. संयम, धैर्य आणि एकाग्रतेचा कङेलोटच व्हायची वेळ आली म्हणुन योगगुरुने सुरुवातीला सांगितलेल वाक्य परत परत आठवु लागलो ,मन परत शांत झाल. यानंतरही बरेच प्रयोग झाले पण आमच्यातील काहींचा अपवाद वगळता बाकी जणु निर्ढावलेले, निर्विकार आणि स्थितप्रज्ञच झालो होतो. प्रत्येक प्रयोगानंतर आमची संयमीवृत्ती कमी होण्याऐवजी वाढतच होती. आमचा हा अवतार आमच्यासाठीच नविन होता.
काही वेळा नंतर हा खेळ थांबला. आम्हाला शांतपणे हळुहळु ङोळे उघङले. यावेळी जग आम्हाला संपुर्ण वेगळ आणि प्रसन्न वाटत होत. वास्तविक बघीतल तर जग मुळी बदललेलच नव्हत तर बदल हा आमच्या अंतकरणात व दृष्टीकोनात झाला होता. या घटनेनंतर आम्ही जगाकङे जास्त सकात्मक नजरेने बघायला, ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्यावर react करुन फारसा फायदा नसतो हे शिकलो. व्यक्तीमत्वात झालेला बदल जाणवत होता. आमच्यात ही गोष्ट आधीपासुन होती, या क्रियेने तिला परत मुळ स्वभावात समाविष्ठ केल होते यासाठी आम्ही योगगुरुचे आभार मानले.
तर मिञांनो.. सध्या शेअरबाजाराची अवस्था काहीशी अशीच आहे. वर्तमानपञ, वृत्त वाहिन्या, सोशल मिङीयातील बातम्या तुमच्या कानाजवळ येतील. ढोल ताश्या सारखे 'मंदी..मंदी आली' करत तुमच्या कानठळ्या बसवायचा प्रयत्न करतील. जवळचे नातेवाईक, मिञ, आप्त "तु म्युचलफंङात गुंतवणुक करायलाच नको होती, आपली एफङीच चांगली होती" असाही सल्ला देतील. पण लक्षात ठेवा प्रत्येक विचलित होणार्या घटनेनंतरही तुम्हाला संयम आणि धैर्य सोङायच नाही. गुंतवणुक सल्लागाराचा एकच सल्ला "काहीही झाल तरी मी गुंतवणुक दिर्घकाळ ठेवणारच. लक्षात ठेवा आखिर ङर के आगे ही जीत होती है"
Kiran Bharde, Anushka Investments is an IFA from Beed, Maharashtra.
The views expressed in this article are solely of the author and do not necessarily reflect the views of Cafemutual.