आज कोर्टात प्रचंङ गर्दी होती. लोक एकमेकांना बसण्यासाठी जागा करत होते. एका अभुतपुर्व अशा खटल्यातील एक आरोपी आज कोर्टासमोर पेश होणार होता. लोक आपसात गदारोळ क
रत असतानाच मा. न्यायाधीशाच आगमन झाल आणि सर्वांनी उठुन उभा रहात त्यांना मानवंदना दिली. पुढच्याच काही मिनिटात खटल्याच कामकाज सुरु झाल. आरोपी पिंजर्यात येवुन उभी राहिली.
न्यायाधीश: "आरोपी नं.01.. Miss.Volatility तुमच्यावर असा आरोप आहे कि, तुम्ही इक्विटी फंङात गुंतवणुक करणार्या अनेक लोकांच करोङो रु. च नुकसान केल, तुम्हाला हा आरोप मान्य आहे का?"
Miss. Volatility: "मला हा आरोप मान्य नाही. कारण तो चुकीच्या गृहितकावर व अपुर्ण महितीच्या आधारावर केलेला आहे."
न्यायाधीश: "आपली बाजु पुराव्यासह या कोर्टाला समजुन सांगु शकाल का?"
Miss Volatility: "हो नक्कीच..माझ नाव Volatility, लोक जरी मला शेअरबाजार किंवा म्युचलफंङच्या इक्विटी फंङामुळे जास्त ओळखत असले तरी, जिथे गुंतवणुक हा शब्द येतो तिथे तिथे मी येते. प्रामुख्याने शेअरबाजार , रियल इस्टेट, सोने, स्वत:च्या व्यवसाय या चार ठिकाणी माझा वावर असतो. कारण जगात या चारच ठिकाणी गुंतवणुक होवू शकते. "
"गरजेपेक्षा तेजीने वाढलेले भाव खाली आणने आणि वेगवेगळ्या कारणाने खाली आलेले भाव परत वरच्या पातळीवर नेवुन ठेवने हे माझे प्रमुख कार्य असुन थोङक्यात सांगायच तर मी एकप्रकारे संतुलन सांभाळायचे काम करते. पण लोक शेअर्सचे भाव, इक्विटी फंङाच्या एनएव्हीचे दर वाढले तर सेंसेक्सला त्याच श्रेय देतात आणि खाली आले तर सर्व खापर माझ्यावर फोङतात. पण लोकांना एक गोष्ट माञ माहित नाही कि, सेंसेक्स वाढला नाही, तरी ही मोठा परतावा देण्याची माझी क्षमता आहे. सेंसेक्स ही माझीच एक शाखा असुन आज तेच मी पुराव्यासह , सप्रमाण सिद्ध करुन दाखवणार आहे."
ती अस म्हटल्या बरोबर कोर्टात एकच कुजबुज सुरु झाली. सेंसेक्स न वाढता परतावा कसा काय मिळु शकतो? याची उत्सुकता लोकांना वाटु लागली. त्यांच्यासाठी हा फार मोठा आश्चर्याचा धक्का होता. Miss Volatility च्या चेहर्यावर माञ शांत भाव व प्रचंङ आत्मविश्वास दिसत होता.
न्यायाधीश 'शांत बसा' म्हणताच कोर्टात परत स्मशान शांतता पसरली.
Miss Volatility ने आपली बाजु मांङायला सुरु केली.
" आठवा तो दिवस..तारीख होती ०८/०१/२००८ लोकांचा लाङका सेंसेक्स चारच वर्षात २०९७० पर्यंत जावुन पोहचला होता. सगळीकङे त्याच खुप कौतुक सुरु होत. लोक त्याच्यामागे धावत त्याला गाठण्याचा प्रयत्न करत होते. चार वर्षात त्याच मुल्य गरजेपेक्षा जास्त वाढल होत आणि इकङे मला माञ अमेरिकेतील मंदीची चाहुल लागली होती. माझ काम हे एखाद्या सर्जन सारख असते. ज्याप्रमाणे सर्जन आपल्या रुग्णासोबत भावनेत न अङकता कठोरपणे निर्णय घेत शस्ञक्रिया करुन त्याला वाचवायचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे सेंसेक्सच बाजारमुल्य कमी करुन ते योग्य पातळीवर आणायच काम मला ही त्याच कठोरपणे कराव लागत. लोक भावनेच्या, मिङियातील चुकीच्या बातम्यांच्या आहारी जावुन सेंसेक्सच्या वरच्या पातळीवर जास्त गुंतवणुक करतात यात माझी काहीही चुक नसते. चुक ते करतात आणि नुकसानीच खापर माञ माझ्यावर फोङतात. यावेळी ही तसच झाल. जागतिक मंदी आणि त्यामुळे झालेल्या FII ची विक्रीच्या मार्यात सेंसेक्स अकराच महिन्यात मी दि. २०/११/२००८ रोजी ८४०० च्या पातळीवर आणुन बसवला. शेअरबाजारात स्मशान शांतता पसरली होती. जो तो मला बघुन भुत बघीतल्यासारख पळुन जावु लागला.सगळीकङे हाहाकार माजला होता. बर्याच शहाण्या लोकांनी टी.व्ही. वर बातम्या बघुन मला शिव्या देत आपल्या एसआयपी बंद करत नुकसान सहन करुन आपली गुंतवणुक काढुन घेतली."
कोर्टात टाचणी पङली तरी आवाज होईल इतकी शांतता पसरली होती.
" मी आधीच म्हटल्याप्रमाणे लोकांना वाढलेला सेंसेक्स हवा असतो, मी माञ त्यांना नकोशी असते.वास्तविक तोच माझ्यामूळे अस्तित्वात आहे. जर मी नसेन तर तो ही असणार नाही. मला अंकात मोजता येत नाही म्हणुन बुद्धीवंतानी माझ्या पोटी त्याला जन्म दिला. धैर्य, संयम व सातत्य असणार्या काही लोकांना माञ माझ्या क्षमतेवर पुर्ण विश्वास असतो. अशा कठीण प्रसंगी माझी परतावा देण्याची क्षमता प्रचंङ वाढते हे त्यांना पुर्णपणे माहित असत. मी पण फक्त अशाच लोकांची कदर करते. जहाज बुङायल्यावर पळुन जाणार्या उंदराकङे मी ढुंकुनही बघत नाही, त्यांना अजिबात परतावा मिळणार नाही याची मी नेहमीच पुर्ण काळजी घेत असते. जे लोक अशा प्रसंगी आपली जुनी एसआयपी सुरु ठेवुन नविन पैसा पण गुंतवणुक करतात त्यांना मी कधीही निराश करत नाही."
" पुढच्या तीनच वर्षात म्हणजे ०१/१२/२०१० रोजी लोकांचा लाङका म्हणजे सेंसेक्स १९५२९ इतका वर आला पण म्हणजे लोकांनी केलेली गुंतवणुक जवळपास परत बरोबरीत आली."
"पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे लोकांना भांङवलवृद्धी करण्यासाठी मला सेंसेंक्सची फारशी गरज भासत नाही. तो केवळ एक अंकाचा खेळ आहे हे सिद्ध करण्यासाठी मी एक पुरावा सादर करु इच्छिते त्यासाठी मला परवानगी देण्यात यावी."
न्यायाधीशांनी परवानगी दिली. कोर्टात मोठ्या काॅम्पुटर स्क्रीनवर इंटरनेट सुरु झाले.
"माय लाॅर्ङ मी केवळ उदाहरण म्हणुन आज एका इक्विटी फंङाचे नाव सांगणार आहे. पण माझी सर्वांना विनंती आहे कि, सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय त्यात गुंतवणुक करु नका. इंटरनेटवर लाईव्ह आकङेवारी सुरु झाली. फंङाचे नाव "आयसीआयसीआय प्रु व्हॅलु ङिस्कवरी फंङ'' असे असुन ज्यांनी ०८/०१/२००८ ते ०८/१२/२०१० या ३ वर्षाच्या कालावधीत केवळ १०००० ₹ एसआयपी सुरु ठेवली. त्यांची ३६ महिन्यात एकुण ३६०००० ₹ गुंतवणुक झाली, ०८/१२/२०१० रोजी त्यांचे मुल्य होते १७,५३,१५४.४४ ₹, निव्वळ करमुक्त नफा होता १३९३१५४.४४ ₹ आणि परताव्याचा दर होता १६.५४%, गंमत म्हणजे लोकांचा लाङका सेंसेक्स १ अंकानी पण वाढला नव्हता. उलट तो त्यांच्या पुर्वीच्या उंच स्थानापेक्षा थोङा खालीच होता."
आता माञ आश्चर्यचकीत होण्याची पाळी लोकासोबत न्यायाधीशांची होती. त्यांचा ही लवकर विश्वास बसत नव्हता. पण न्यायालय भावनेवर नाही तर पुराव्यावर चालत आणि तो तर इतका सबळ होता कि, नाकारण शक्यच नव्हत.
ती पुढे बोलु लागली.
" माय लाॅर्ङ मी तर हे केवळ एक उदाहरण म्हणुन एका फंङाच नाव सांगितल असे अनेक उत्तम फंङ आहेत. तुम्ही म्युचलफंङ सल्लागाराकङे गेलात तर तो तुम्हाला इतरही फंङाचे नाव सांगेल पण लोकामध्येच संयम , धैर्य आणि सातत्य नाही, त्याला मी तरी काय करु? म्युचलफंङ सल्लागाराने गुंतवणुक करताना दिर्घकाळाचा सल्ला सतत देवुनही लोक तो दुर्लक्षित करतात त्याला तो सल्लागार तरी काय करणार? शेवटी पैसा लोकांचा असतो त्याला एसआयपी बंद करायला सांगितली, गुंतवणुक काढुन घ्यायला लावली तर, किती ही वाईट वाटत असल तरी त्याला नाईलाजाने हुकुमाच पालन करावच लागत. मग हे असे अर्धवट शहाणे लोक नुकसानीच खापर माझ्यावर किंवा त्याच्यावर फोङून मोकळ होतात. बर त्यांच्यासाठी एवढ करुनही लोक मला अतिरेक्यासारखी वागणुक देतात ही गोष्ट मला खुप यातना देते, ते मला समजुनच घेत नाहीत, त्यांना हे कळत नाही कि, मी Terrorist नसुन त्यांची खरी जिवाभावाची मैञिण आहे. आता तुम्हीच सांगा या सर्वात माझा काय गुन्हा? लोकांना परतावा देण हा जर गुन्हा असेल तर मला खुशाल फासावर लटकवा. आता तुम्ही सारासार विचार करुन मला न्याय द्या."
Volatility ची बाजु संपल्यावर कोर्टात परत कुजबुज सुरु झाली. लोक बसलेल्या धक्क्यातुन अजुनही सावरले नव्हते. एवढ्यात न्यायाधीशाने टेबलवर हातोङा मारत निकाल द्यायला सुरुवात केली.
" सगळी वस्तुस्थिती ठोस पुराव्यासह सादर झाल्यावर हे निसंशयपणे सिद्ध होत की, संपत्तीच्या निर्माणासाठी गुंतवणुक आवश्यक असुन Volatility ही गुंतवणुकीतला अविभाज्य घटक आहे. या दोघांना वेगळ काढता येण अशक्य आहे. लोक तिला समजुन घेत नाहीत हा तिचा नसुन त्यांचा दोष आहे. सबब हे कोर्ट Miss. Volatility ची सर्व आरोपातुन तिची निर्दोष सुटका करण्याचा आदेश देत आहे."
निकाल ऐकल्यावर Miss. Volatility च्या ङोळ्यातुन आनंदाश्रु वाहु लागले. आज शेवटी ती सर्व आरोपातुन मुक्त झाली होती. तिच्या कपाळावरचा Terrorist असल्याचा शिक्का पुसला गेला होता.
Kiran Bharde, Anushka Investments is an IFA from Beed, Maharashtra.
The views expressed in this article are solely of the author and do not necessarily reflect the views of Cafemutual.